जॉर्डन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्डन
المملكة الأردنية الهاشمية
अल्‌ मामलका अल्‌ उर्दुन्निया अल्‌ हाशिमिया
जॉर्डनाचे हाशेमी राजसत्ताक
जॉर्डनचा ध्वज जॉर्डनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: अल्ला, अल्‌ वतन, अल्‌ मालेक
('देव, राष्ट्र, राजा')
राष्ट्रगीत: अस्‌ सलाम अल्‌ मालकी अल्‌ उर्दोनी
('जॉर्डनचे महाराज चिरायु असोत.')
जॉर्डनचे स्थान
जॉर्डनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अम्मान
अधिकृत भाषा अरबी
सरकार
 - राष्ट्रप्रमुख अब्दुल्ला दुसरा
 - पंतप्रधान मारौफ अल्‌ बाखीत
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ('लीग ऑफ नेशन्स'पासून)
मे २५, १९४६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८९,३४२ किमी (११२वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.०१
लोकसंख्या
 -एकूण ५७,०३,००० (१०६वा क्रमांक)
 - घनता ६४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २७.९६ अब्ज अमेरिकन डॉलर (९७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,८२५ अमेरिकन डॉलर (१०३वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन जॉर्डेनियन दिनार (JOD)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+२
आय.एस.ओ. ३१६६-१ JO
आंतरजाल प्रत्यय .jo
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९६२
राष्ट्र_नकाशा


जॉर्डन, अधिकृत नाव जॉर्डनाचे हाशेमी राजसत्ताक (किंवा जॉर्डनचे हाशेमाईट राज्य)(अरबी: المملكة الأردنية الهاشمية , अल्‌ मामलका अल्‌ उर्दुन्निया अल्‌ हाशिमिया ;) हा पश्चिम आशियातील एक राजसत्ताक देश आहे. हा देश जॉर्डन नदीच्या पूर्व तीरावर वसला असून याच्या आग्नेयेस सौदी अरेबिया, पूर्वेस इराक, उत्तरेस सीरिया व पश्चिमेस मृत समुद्रावर सह-अधिकार असलेले इस्राएलवेस्ट बँक हे देश आहेत. अम्मान ही जॉर्डनाची राजधानी आहे.

भुगोल[संपादन]

उन्हाळ्यात उष्ण असणार्‍या या देशात हिवाळ्यात अम्मानसह व इतर काही डोंगराळ भागांत हिमवृष्टी होते.

इतिहास[संपादन]

या भागात आतापर्यंत मानवाच्या सर्वात जुन्या सांस्कृतिक जडणघडणीचे अवशेष सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत. प्राचीन काळापासून या प्रदेशात आणि त्याच्या चारी बाजूला प्रबळ राज्ये-साम्राज्ये असल्याने महत्त्व होते. तसेच महत्त्वाचे व्यापारी मार्ग तेथून जात असल्याने या भागाला अनन्यसाधारण राजकीय आणि आर्थिक महत्त्व पुर्वी होते. इ स पूर्वी चवथ्या शतकाच्या आसपास स्थापन झालेल्या नेबॅतियन राज्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. या नेबॅतियन राज्याचे पेत्रा दरी (पेत्रा व्हॅली) हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि जगप्रसिद्ध ठिकाण आहे.

आधुनिक काळ[संपादन]

इ.स. १९४६ साली जॉर्डनला ब्रिटन नेपूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले आणि राजा अब्दुल्ला (पहिला) आधुनिक जॉर्डनचा पहिला राजा बनला.

राजकिय[संपादन]

जॉर्डनमध्ये २००३ मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक होऊन लोकांनी निवडलेल्या संसदेची स्थापना झाली.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: