नवनाथ कथासार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकिस्रोत
नवनाथ कथासार हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.


नवनाथ भक्तिसार’ या धुंडीसुत मालुकविविरचित प्रासादिक ग्रंथातील कथांचे सार



नवनारायण नवनाथ[संपादन]

नवनाथ नवनारायण गुरू
मच्छिंद्रनाथ कवि दत्तात्रेय
गोरक्षनाथ हरि मच्छिंद्रनाथ
गहिनीनाथ करभाजन गोरक्षनाथ
जालिंदरनाथ अंतरिक्ष दत्तात्रेय
कानिफनाथ प्रबुद्ध जालिंदरनाथ
भर्तरीनाथ द्रुमिल दत्तात्रेय
रेवणनाथ चमस दत्तात्रेय
नागनाथ आविर्होत्र दत्तात्रेय
चरपटीनाथ पिप्पलायन दत्तात्रेय

नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करित होते. शके सत्राशें दहापर्यंत ते प्रकटरूपानें फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्यें कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजुनें मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असें म्हणतात तो राहिला. जालंदनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरीपीर म्हणतात. वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ वीटगांवीं राहिला चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अंडबंगी नाथ गुप्तरुपानें अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत. भर्तरी ( भर्तृहरि ) पाताळीं राहिला. मीननाथानें स्वर्गास जाऊन वास केला. गिरिनारपर्वतीं श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमांत गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. मग विष्णुनें विमान पाठवुन मैनावतीस वैकुंठास नेलें. चौऱ्यांयशीं सिद्धांपासुन नाथपंथ भरभराटीस आला.

आतां नवनाथानें चरित्र संपलें असें सांगुन मालुकवि म्हणतात. गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयीं असा अभिप्राय आहे कीं, यास जो कोणी असल्या मानील किंवा त्याची निंदा करील तो विघ्नसंतोषी इहपरलोकीं सुखी न राहतां त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकांत पडेल. हा श्रीवनाथभक्ति कथासागर ग्रंथ शके सत्राशें एकेचाळीस, प्रमाथीनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकवीनें श्रोत्यांस सुखरुप ठेवण्यासाठीं व त्यांचे हेतु परिपूर्ण होण्यासाठीं श्रीदत्तात्रेयाची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला.

मूळ स्रोत ग्रंथ मजकुराचे विकिस्रोत स्थानांतरण[संपादन]

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: नवनाथ कथासार हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:नवनाथ कथासार येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.