लेसोथो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लेसोथो
Muso oa Lesotho
Kingdom of Lesotho
लेसोथोचे राज्य
लेसोथोचा ध्वज लेसोथोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Khotso, Pula, Nala" (सोथो)
शांती, पाऊस, सुबत्ता
राष्ट्रगीत: Lesotho Fatse La Bontata Rona
लेसोथो, आपली पितृभूमी
लेसोथोचे स्थान
लेसोथोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी मासेरु
अधिकृत भाषा सोथो, इंग्लिश
सरकार सांसदीय संविधानिक राजेशाही
 - राष्ट्रप्रमुख लेट्झी ३
 - पंतप्रधान टॉम थाबाने
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ४ ऑक्टोबर १९६६ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ३०,३५५ किमी (१४०वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण २०,६७,००० (२००९) (१४६वा क्रमांक)
 - घनता ६८.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.२७७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,२४४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.४२७ (कमी) (१५८ वा)
राष्ट्रीय चलन लोटी
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०२:०० (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ LS
आंतरजाल प्रत्यय .ls
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६६
राष्ट्र_नकाशा


लेसोथो हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. लेसोथोच्या चारही बाजुंना दक्षिण आफ्रिका देशाच्या सीमा आहेत. दुसर्‍या स्वतंत्र देशाच्या पुर्णपणे अंतर्गत असलेला लेसोथो जगातील केवळ ३ देशांपैकी एक आहे (सान मारिनोव्हॅटिकन सिटी हे इतर दोन्ही देश इटलीमध्ये आहेत.) मासेरु ही लेसोथोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

१८६८ सालापासून ब्रिटिश साम्राज्याचे मांडलिक राष्ट्र राहिल्यानंतर १९६६ साली लेसोथोला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडीला लेसोथो राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे सांसदीय संविधानिक राजेशाही प्रकारचे सरकार आहे. येथील राजाला औपचारिक महत्त्व असून सर्व संविधानिक अधिकार संसद सांभाळते. लेसोथोची अर्थव्यवस्था शेती, खाणकाम, उत्पादन इत्यादी उद्योगांवर अवलंबून असून येथील ४० टक्के लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेच्या खाली जगतात.

ह्या भागातील इतर देशांप्रमाणे लेसोथोदेखील एड्सच्या मगरमिठीत अडकला आहे. २००९ मधील पाहणीनुसार येथील २३.६ टक्के लोकांना एच.आय.व्ही. विषाणूची लागण झाली आहे व येथील सरासरी आयुर्मान केवळ ४२ वर्षे आहे. एड्सचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू असून ह्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

लेसोथो आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात स्थित असून तो चारही बाजूने दक्षिण आफ्रिका देशाने वेढला गेला आहे. संपूर्णपणे १,००० मीटर (३,३०० फूट) पेक्षा अधिक उंचीवर वसलेला लेसोथो हा जगातील एकमेव स्वतंत्र देश आहे. ह्या उंचीमुळे येथील हवामान शीतल असते.

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

लेसोथोचे १० जिल्हे

राजकीय दृष्ट्या लेसोथो १० जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

लेसोथोची लोकसंख्या अंदाजे २०.६७ लाख इतकी असून येथील २५ टक्के जनता शहरी तर ७५ टक्के ग्रामीण आहे.

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: