लात्व्हिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लात्व्हिया
Latvijas Republika
लात्व्हियाचे प्रजासत्ताक
लात्व्हियाचा ध्वज लात्व्हियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत:
Dievs, svētī Latviju!
(देवा, लात्व्हियाला आशिर्वाद दे!)
लात्व्हियाचे स्थान
लात्व्हियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
रिगा
अधिकृत भाषा लात्व्हियन
सरकार संसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्राध्यक्ष आन्द्रिस बेर्झिन्स
 - पंतप्रधान व्हाल्दिस दोम्ब्रॉव्स्किस
महत्त्वपूर्ण घटना
स्वातंत्र्य रशियापासून 
 - घोषणा १८ नोव्हेंबर १९१८ 
 - मान्यता २६ जानेवारी १९२१ 
 - सोव्हियेत संघाचे अतिक्रमण ५ ऑगस्ट १९४० 
 - नाझी जर्मनीचे अतिक्रमण १० जुलै १९४१ 
 - सोव्हियेत संघाचा पुन्हा कब्जा १९४४ 
 - स्वातंत्र्याची पुनर्घोषणा ४ मे १९९० 
 - स्वातंत्र्य २१ ऑगस्ट १९९१ 
युरोपीय संघात प्रवेश १ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ६४,५८९ किमी (१२४वा क्रमांक)
 - पाणी (%) १.५७
लोकसंख्या
 -एकूण २२,१७,०५३ (१४३वा क्रमांक)
 - घनता ३४.३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३४.९२१ अब्ज[१] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १५,६६२ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०११) ०.८०५ (अति उच्च) (४३ वा)
राष्ट्रीय चलन युरो
भूतपूर्व: लात्व्हियन लॅट्स
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ LV
आंतरजाल प्रत्यय .lv
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३७१
राष्ट्र_नकाशा


लात्व्हियाचे प्रजासत्ताक (लात्व्हियन: Latvijas Republika) हा उत्तर युरोपातीलबाल्टिक देशांपैकी एक देश आहे. लात्व्हियाच्या उत्तरेला एस्टोनिया, पूर्वेला रशिया, आग्नेयेला बेलारूस, दक्षिणेला लिथुएनिया हे देश तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. रिगा ही लात्व्हियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लात्व्हिया ला युरोपियन संघामधील सर्वात कमी लोकसंख्येच्या व सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे. भूगोल, लोकजीवन, संस्कृती इत्यादींबाबतीत लात्व्हिया एस्टोनिया व लिथुएनिया ह्या इतर बाल्टिक देशांसोबत मिळताजुळता आहे.

ऐतिहासिक काळापासून अनेक साम्राज्यांचा भूभाग राहिलेल्या लात्व्हियाने पहिल्या महायुद्धानंतर १९१८ साली रशियन साम्राज्यापासून स्वातंत्र्याची घोषणा केली. परंतु केवळ २२ वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर १९४० साली सोव्हियेत संघाने लष्करी आक्रमण करून हा भूभाग बळकावला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीची लात्व्हियावर सत्ता होती. महायुद्ध संपल्यानंतर सोव्हियेत संघाने पुन्हा येथे आपले अधिपत्य प्रस्थापित केले व लात्व्हियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्याची स्थापना केली. १९९१ सालच्या सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर लात्व्हिया पुन्हा एकदा स्वतंत्र झाला.

स्वतंत्र झाल्यानंतर लात्व्हियाने बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला आहे. आजच्या घडीला लात्व्हिया एक प्रगत देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात ४३व्या क्रमांकावर आहे. २००८-२०१० दरम्यानच्या जागतिक मंदीदरम्यान प्रचंड अधोगती झाल्यानंतर २०११ साली लात्व्हियाची अर्थव्यवस्था युरोपियन संघामध्ये सर्वात वेगाने वाढली[२]. सध्या लात्व्हिया संयुक्त राष्ट्रे, नाटो, युरोपियन संघ, युरोपाची परिषद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, डब्ल्यू.टी.ओ. इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

लात्व्हिया उत्तर युरोपामध्ये बाल्टिक समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील ६४,५८९ चौरस किमी भूभागावर वसला असून ह्यापैकी ३४,९६४ चौरस किमी जमीन घनदाट जंगलाने व्यापली आहे. लात्व्हियाची सीमा एकूण १,८६६ किमी लांब असून ह्यापैकी ४९८ किमी सागरी सीमा आहे. दौगाव्हा ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी लात्व्हियाच्या रिगा येथे बाल्टिक समुद्राला मिळते.

हवामान[संपादन]

लात्व्हियामध्ये जवळजवळ समान कालखंडाचे चार भिन्न ऋतू अनुभवायला मिळतात. लात्व्हियाचे हवामान सौम्य व थंड स्वरूपाचे असून येथील हिवाळे तीव्र तर उन्हाळे शीतल असतात. हिवाळ्यांमध्ये किमान तापमान -३० °से पर्यंत जाते व मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होते.

२०११ साली लात्व्हियामधील सरासरी तापमान[३]
महिना
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
सरासरी तापमान (°से)
-3.0
-8.9
-0.5
+6.8
+11.2
+17.3
+19.8
+16.8
+13.4
+7.8
+4.4
+2.1

पर्यावरण[संपादन]

लात्व्हियाची जमीन बऱ्याच अंशी सपाट व सुपीक आहे. फिनलंड, स्वीडनस्लोव्हेनिया खालोखाल युरोपात सर्वाधिक जंगले असण्याचा मान लात्व्हियाला मिळतो. येथील ५६ टक्के भूमी जंगलाने व्यापली आहे. येथील २९ टक्के जमीन शेतीसाठी वापरली जाते. सोव्हियेत संघामधून वेगळे झाल्यानंतर लात्व्हियाने एकत्रित कृषीपद्धत बंद केली ज्यामुळे लागवडीखाली असणारी जमीन मोठ्या प्रमाणावर घटली. सध्या येथे प्रामुख्याने लहान शेते पाहण्यास मिळतात ज्यांपैकी अनेक ठिकाणी जैविक पद्धती वापरून पिके घेतली जातात.

लात्व्हियामध्ये पर्यावरण रक्षणासाठी कठोर कायदे आहेत. येथे ७०६ संरक्षित क्षेत्रे आहेत ज्यांचे प्रमाण लात्व्हियाच्या क्षेत्रफळाच्या २० टक्के आहे. ह्यांपैकी चार राष्ट्रीय उद्याने असून ९१७ वर्ग किमी भाग व्यापलेले ग्वाया राष्ट्रीय उद्यान हे येथील सर्वात मोठे उद्यान आहे. २०१२ साली पर्यावरणासाठी अनुकूल अशी धोरणे राबवणारा लात्व्हिया हा जगातील दुसरा सर्वोत्तम देश होता (स्वित्झर्लंड खालोखाल).[४]

राजकीय विभाग[संपादन]

लात्व्हिया हा एक केंद्रशासित देश असून तो ११० नगरपालिका व ९ राष्ट्रीय शहरांमध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे[संपादन]

सर्वात मोठी शहरे
शहर लोकसंख्या
रिगा
७,०५,७०३
दौगौपिल्स
१,०३,०५३
लीपाया
८३,८८४
येल्गाव्हा
६४,७४८
युर्माला
५६,१४७

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ[संपादन]