|
झीरो ए.डी. हा एक विनामूल्य, मुक्त-स्रोत, अनेक प्लॅटफॉर्म असलेला वास्तव-काल डावपेच प्रकारचा संगणकीय खेळ आहे. हा खेळ सध्या विकसनशील अवस्थेत आहे व वाइल्डफायर गेम्स हे त्याचे विकासक आहेत. हा ऐतिहासिक युद्धे व प्राचीन अर्थव्यवस्था यांवरील खेळ असून यात ख्रिस्तपूर्व ५०० ते इसवीसन ५०० या काळावर लक्ष केंद्रित केले आहे[१][२]. हा खेळ मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅक ओएस एक्स व लिनक्स यावर खेळता येतो.[३] हा खेळ विनामूल्य व मुक्त-स्रोत असून खेळाच्या इंजिनासाठी जीपीएल २+ हा परवाना तर खेळातील दृश्य व चित्रे यासाठी सीसी-बीवाय-एसए हा परवाना वापरण्यात आला आहे. हा खेळ २००० सालापासून विकसित होत आहे व त्याचे प्रत्यक्ष काम २००३ सालापासून सुरू झाले आहे. संपूर्ण आवृत्तीसाठी कोणतीही अधिकृत तारीख ठरलेली नाही.[४]
झीरो ए.डी. मध्ये वास्तव - काल डावपेच प्रकारातील खेळांचे तळ उभारणे, सैन्य प्रशिक्षित करणे, लढाई व तंत्रज्ञान शोध हे घटक आहेत. हा खेळ आर्थिक विकास व लढाया यांच्याशी संबंधित आहे. या खेळात प्रत्येक संस्क्रुतीसाठी विशिष्ट इमारती, सैनिक, नौका व युद्धनौका इत्यादी आहेत.
अनेक-खेळाडू एकाचवेळी खेळण्याची सुविधाही या खेळात उपलब्ध असून त्यामध्ये केंद्रीय सर्व्हरविरहित असलेले आंतरजाल वापरले जाते.
झीरो ए.डी. खेळाडूला अकरा प्राचीन संस्कृत्यांपैकी कोणतीही संस्कृती निवडण्याची मुभा देते. पुढच्या आवृत्त्यांमध्ये विकासकांनी जर्मेनिक, व्हॅन्डाल, हूण, डॅसियन, सर्मॅशियन, नंतरचे रोमन प्रजासत्ताक, रोमन साम्राज्य, बायझेंटाईन साम्राज्य, सॅक्सन, पार्थियन साम्राज्य, गॉथ या संस्कृत्या उपलब्ध करणार असल्याचे सांगितले आहे.[५]
पुढे वाचा...
मागील अंक - मे २०१५ - एप्रिल २०१५ - मार्च २०१५ - ऑक्टोबर २०१४ - ऑगस्ट २०१३ - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक
पुढील अंक - पुढच्या मुखपृष्ठ सदराबद्दल आपले मत येथे द्या.
|
मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
|
|
|
|
|
पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग
|
|
|
|
|
अलिकडील मृत्यू: रामकृष्ण सूर्यभान गवई, ए.पी.जे. अब्दुल कलाम, वसुंधरा कोमकली, लक्ष्मण लोंढे भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर |
|
ग्रीक संस्कृती चा उदय इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास युरोप खंडाच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या लहान-लहान बेटांमध्ये झाला. येथील लोक 'ग्रीक' म्हणून ओळखले जातात आणि त्यांची संस्कृती म्हणजे 'ग्रीक संस्कृती' होय. ग्रीसमध्ये विशिष्ट प्रकारची संस्कृती उदयास येण्यास तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरली. ग्रीसच्या उत्तरेला पर्वतांच्या रांगा आहेत. इतर तिनही दिशांना भूमध्य समुद्र आहे. त्यामुळे तेथील लोक उत्तम दर्यावर्दी बनले. तुटक डोंगराळ प्रदेश व शेकडो लहान-लहान बेटे यामुळे तेथे लहाल-लहान नगर राज्ये उदयास आली. मात्र प्रबळ मध्यवर्ती सत्ता उदयास येऊ शकली नाही.
डोंगराळ प्रदेश, शेकडो लहान लहान बेटे, मर्यादित शेतजमीन यामुळे ग्रीक समाज छोट्या-मोठ्या समूहामध्ये विभागला गेला होता. कालांतराने या समूहामधून नगरराज्ये उदयास आली. या नगराज्यामधून ग्रीक संस्कृती विकसीत झाली. सर्वसाधारणपणे या या नगरराज्यांमध्ये लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था होती. काही ठिकाणी राजसत्ता होती. मात्र तेथे राजे निवडून दिले जात असत. लोकशाहीची कल्पना ही ग्रीक संस्कृतीने जगाला दिलेली देणगी मानली जाते.
पुढे कालांतराने आपापंसातल्या युद्धामुळे ग्रीक नगरराज्ये दुर्बळ बनली. इ.स.पूर्व ३३८ मध्ये मॅसिडोनियाचा राजा फिलिप याने ग्रीक नगरांज्यावर आक्रमण करून ती आपल्या राज्यात समाविष्ट केली.
ग्रीक नगरराज्ये भौगोलिकदृष्ट्या छोट्यछोट्या बेटांमध्ये विभागली गेली असली तरी त्यांची समाजरचना, त्यांच्या धर्मकल्पना व त्यांची जीवनपद्धती यांमध्ये बरेच साम्य होते, म्हणून या नगरराज्यांच्या एकत्रित संस्कृतीला ग्रीक संस्कृती असे म्हणतात. (पुढे वाचा...)
|
मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
|
|
- ...की, सिंहाची डरकाळी आठ ते दहा मैलां पर्यंत ऐकू येते?
- ...की, फ्रांस या देशात एकही डास नाही?
- ...की, तुर्कीमधील इस्तंबूल जगातील एकमेव असे शहर आहे जे आशिया व युरोप या दोन खंडांत विसावले आहे?
- ...की, जिराफाच्या पाठीत जेवढे मणके असतात (सहा) तेवढेच मणके उंदराच्या पाठीत असतात?
- ...की, आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठी ज्वालामुखी मंगळावर आहे. या ज्वालामुखीची उंची २६.४ कि.मी. आहे?
- ...की, जगातील सर्वात खोल जागा प्रशांत महासागरातील मरियाना ही आहे. हिची खोली ११ कि.मी. एवढी आहे?
- ...की, आपल्या चाव्यांनी माणसाला हैराण करणाऱ्या डासांना दात नसतात?
- ...की, ताजमहालाचा रंग सकाळी गुलाबी, दुपारी पांढरा तर रात्री सोनेरी दिसतो?
- ...की, सहारा वाळवंटातील तापमान सकाळी ४५ अंश सेल्सियस असते तर रात्री ते ५ अंश सेल्सियस पर्यंत उतरते?
- ...की, शुक्र हा ग्रह हा पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो त्यामुळे तेथे सूर्य हा पश्चिमेकडे उगवतो व पूर्वेकडे मावळतो?
- ...की, पी.टी. उषा हीचे पूर्ण नाव पीलुवालकंडी टेकापरवील उषा असे आहे?
- ...की, बिल गेट्स प्रत्यक सेकंदाला १२००० रूपये व एका दिवसात १०३ कोटी रूपये कमावितो?
- ...की, ज्या हाताने तुम्ही लिहीता त्या हाताच्या बोटाची नखे सगळ्यात जास्त वेगाने वाढतात?
- ...की, फक्त मनुष्य हा प्राणीच पाठीवर झोपू शकतो?
वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे.
|
|