मार्च ३१
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | मार्च २०१५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |
मार्च ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९० वा किंवा लीप वर्षात ९१ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८६७ - प्रार्थना समाजची स्थापना.
विसावे शतक[संपादन]
- १९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
- १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
एकविसावे शतक[संपादन]
- २००१ - भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.
जन्म[संपादन]
- १८४३ - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक.
- १८६५ - आनंदीबाई गोपाळराव जोशी, पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक.
- १९०६ - जनरल के. एस. थिमय्या, भारतीय सरसेनापती.
मृत्यू[संपादन]
- १७२७ - सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
- १९२६ - दत्तात्रय बळवंत पारसनीस, इतिहास संशोधक.
- १९४५ - फ्रेडरिक बर्गियस, जर्मन रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेता.
- १९७२ - मीनाकुमारी, हिंदी चित्रपटअभिनेत्री.
- २००० - डॉ. हरदेव बहारी, हिंदी लेखक आणि शब्दकोशकार.
- २००४ - गुरुचरणसिंग तोहरा, अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष.
- २००४ - गणपतराव वडणगेकर गुरुजी, कोल्हापूरचे चित्रकार,कलादिग्दर्शक.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- मुक्ती दिन - माल्टा.
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर मार्च ३१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २९ - मार्च ३० - मार्च ३१ - एप्रिल १ - एप्रिल २ - (मार्च महिना)