आंध्र प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?आंध्र प्रदेश
भारत
—  राज्य  —
नागार्जुनसागर बांध
नागार्जुनसागर बांध
गुणक: 16°30′N 80°36′E / 16.5, 80.6
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,६०,२०५ चौ. किमी (६१,८५५ चौ. मैल)
राजधानी हैदराबाद
मोठे शहर हैदराबाद
जिल्हे २३
लोकसंख्या
घनता
४९ (५ वे) (२०११)
• ३०७.८/km² (७९७/sq mi)
भाषा तेलुगू
राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहन
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू
स्थापित १ नोव्हेंबर १९५६
विधानसभा (जागा) Bicameral (295+90)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AP
संकेतस्थळ: आंध्र प्रदेश संकेतस्थळ
राजचिन्ह

गुणक: 16°30′N 80°36′E / 16.5, 80.6


आंध्रप्रदेश (तेलगु- ఆంధ్ర ప్రదేశ్) हे भारतीय २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. आंध्रप्रदेशाचे क्षेत्रफळ १६०.२०५ वर्ग कि.मी. असून क्षेत्रफळानुसार ते भारतात आठवे राज्य आहे. २०११ च्या जणगणनेुसार आंध्र प्रदेशाची लोकसंख्या ४९,३८६,७९९ एवढी आहे. लोकसंख्येनुसार आंध्र प्रदेश भारतात दहावे राज्य आहे. या राज्याची नवीन राजधानी गुंटुर जिल्ह्यात गुंटुर शहराच्या पुर्वेला विकसीत करणार आहेत. काही काळा पर्यंत हैदराबाद ही अांध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची राजधानी राहणार आहे.

इतिहास[संपादन]

१ नोव्हेंबर इ.स. १९५६ मधील राज्य पुनर्रचना कायद्याने तेलगु भाषकांचे जुने हैद्राबादमधून आंध्रप्रदेश निर्माण झाले, मराठी भाषकांचा प्रदेश जुने हैद्राबादमधून महाराष्ट्राला जोडला गेला, कन्नड भाषकांचा प्रदेश जुने हैद्राबादमधून कर्नाटाकाला जोडला गेला.

भूगोल[संपादन]

  • आंध्र प्रदेश राज्याचे क्षेत्रफळ २,७५,०६८ वर्ग किमी आहे.
  • राज्याला ९७२ किमीचा समुद्र किनारपट्टी लाभली आहे.
  • आंध्रप्रदेश राज्य अक्षांश- १२°४१' ते २२°उत्तर व रेखांश ७७° ते ८४°४०' पुर्व मध्ये वसलेले आहे.
  • राज्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ८,४६,५५,५३३ असून लोकसंख्येची घनता ३०७.८प्रति वर्ग किमी आहे.

चतुःसीमा[संपादन]

जिल्हे[संपादन]

यावरील विस्तृत लेख येथे पहा.

आंध्र प्रदेशमध्ये २३ जिल्हे आहेत. जिल्ह्यांची यादी अशी -

राज्यातील पर्यटनस्थळे[संपादन]

चारमिनार[संपादन]

चारमिनार

चारमिनार हा मोहम्मद कुली कुतब शहा यांनी १५९१ साली बांधला. शहराचा प्रतिक म्हणून चारमिनार ओळखला जातो. चारमीनार हे नाव त्याच्या बांधलेल्या पध्दतीवरून हे नाव मिळाले. चारमिनार हा ५४ मीटर उंच आहे.

तिरुपती[संपादन]

बालाजीचे विख्यात मंदिर

तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू). येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगूतमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.

श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन[संपादन]

श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हे हैद्राबादपासून २२० किमी अंतरावर आहे.

एथिपोथला धबधबा[संपादन]

राज्याची प्रतिके[संपादन]

राज्य प्रतिके आंध्र प्रदेश
प्रतीक
Kalasha.jpg
कलश
भाषा तेलगु
गीत मा तेलगु तल्लीकी
नृत्य
Kuchipudi Dance Uma Muralikrishna.jpg
कुचिपुडी
प्राणी
Black Buck.jpg
काळवीट
पक्षी
Indian Roller Bandhavgarh.jpg
चास
फुल
Victoria cruziana flower.jpg
वॉटर लिली
वनस्पती
Unripe Neem fruits.jpg
कडुनिंब
खेळ
Kabaddi..JPG
कबड्डी

बाह्य दुवे[संपादन]