Monday, 25 September 2017

‘डब्बा गुल्ल’ व ‘स्वाभिमान’ या दोन मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी

मिस अप्सरा २०१७  सौंदर्य स्पर्धा

नवोदित चेहऱ्यांसाठी आमेन एल.एल.पी चा पुढाकार 

कौशल्याला योग्य ते व्यासपीठ मिळवून देत त्यांच्याकडून नव आविष्काराची निर्मिती व्हावी या उद्देशाने आमेन एल.एल.पी ने मिस अप्सरा २०१७ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले. केवळसौंदर्य हा निकष न ठेवता स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देत ही स्पर्धा रंगली. महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांहून आलेल्या स्पर्धकांनी या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून जवळपास ५०० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातल्या २०० जणांमधून १२० स्पर्धकांची निवड पूर्व प्राथमिक फेरीसाठी करण्यात आली. महाराष्ट्रातल्या विविध शहरांचे प्रतिनिधित्व करण्याऱ्या स्पर्धकांची पूर्व प्राथमिक फेरी मंगळवार २६ सप्टेंबरला पुणे व नागपूर येथे तर बुधवार २७ सप्टेंबरला मुंबईकल्याण तसेच गुरुवार २८ सप्टेंबरला नाशिक येथे रंगणार आहे. पूर्व प्राथमिक फेरीतून ३६ स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाणार आहे. अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या स्पर्धकांचे ग्रुमिंग सेशन व ट्रेनिंग शुक्रवार २९ सप्टेंबरला नाशिक येथे  होणार आहे. शनिवार ३० सप्टेंबरला या स्पर्धेची अंतिम फेरी नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सभागृहात रंगणार असून या स्पर्धेतल्या विजेत्यांना खास पारितोषिक म्हणून अप्सरा मिडिया एंटरटेन्मेंट नेटवर्कच्या डब्बा गुल्ल’ व स्वाभिमान या दोन आगामी मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेसाठी नाशिकच्यातेजस्वी ज्वेलर्सचे सहकार्य लाभले आहे.
या स्पर्धेच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट करताना दिग्दर्शक रोहित आर्या सांगतात कीयोग्य संधी मिळाली तर नवीन कलाकारही यशस्वी चित्रपट देऊ शकतात या हेतूनेच आम्ही ही स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेच्या माध्यमातून  चित्रपटासाठी उदयोन्मुख चेहऱ्यांना संधी देण्याची ही अनोखी संकल्पना निश्चितच आगळी असेल असा विश्वासही ते व्यक्त करतात.
स्वच्छता अभियानाअंतर्गत आज विविध कंपन्या ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करीत असल्या तरी त्यातही अनागोंदी आहे. या उभारणीत अनेकांचे हितसंबंध गुंतल्याने होणारे गोंधळ व सामान्यांची होणारी पंचाईत यावर डब्बा गुल्ल हा सिनेमा विनोदी पद्धतीने भाष्य करतो. तरस्वाभिमान चित्रपटाच्या कथेतून सिद्धांत व तत्वांची लढाई दाखवण्यात येणार आहे. कुटुंब व समाज यातील नातेसंबंधावर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

No comments:

Post a Comment