Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गोपीनाथ मुंडे पक्षाला वेठीला धरीत आहेत
सकाळ वृत्तसेवा
Friday, July 01, 2011 AT 03:45 AM (IST)
ठाणे - "मास लीडर' म्हणून राजकारणात आपला ठसा उमटविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी "टीम लीडर' असल्याने त्यांनाही पुरेशी संधी दिली पाहिजे. पक्ष मजबूत करण्याऐवजी मुंडे भाजपला वेठीला धरीत असल्याची टीका आज सारंगी प्रवीण महाजन यांनी केली.

सारंगी महाजन यांनी "फेसबुक'वर आपल्यासह कुटुंबाला धमक्‍या येत असल्याची कैफियत मांडली होती. याबाबत काही वाहिन्यांच्या पत्रकारांनी संपर्क साधल्यावर गोपीनाथ मुंडेंवर त्यांनी थेट टीका केली. मुंडे कधीही भाजप सोडणार नाहीत. केवळ प्रसिद्धीसाठी ते पोकळ धमक्‍या देत आहेत. आपल्या अस्तित्वासाठी पक्षाला ते वेठीला धरीत आहेत. अशा प्रकारे तिसऱ्या वेळेस ते पक्षाला वेठीला धरीत आहेत. "मास लीडर' असल्याने त्यांनी या वयात पक्ष कार्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे. पक्षाला दुखाविणाऱ्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. पक्षाला वेठीला धरीत असल्याने ते मुरलेले राजकारणी वाटत नाहीत. प्रमोद महाजन हयात नाहीत, हे त्यांनी स्वीकारले पाहिजे, असा सल्लाही सारंगी यांनी दिला आहे; तसेच मुंडे कधीही भाजप सोडणार नाहीत, असा विश्‍वास व्यक्त केला.

शिवसेना आवडते !
यापूर्वी काही राजकीय पक्षांचा प्रस्ताव आला होता; पण ते मी नाकारले. माझ्या कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही; मात्र त्याच वेळी शिवसेनेचे काम आपल्याला आवडते. शिवसेना पक्ष चांगला असल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
On 01/07/2011 05:06 PM kanchan ubhe said:
गोपीनाथ मुंडे यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. भाजपला मजबूत करण्याऐवजी मुंडे भाजपला वेठीला धरीत आहेत.
On 01/07/2011 04:55 PM kanchan ubhe said:
गोपीनाथ मुंडे यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. भाजपला मजबूत करण्याऐवजी मुंडे भाजपला वेठीला धरीत आहेत.
On 01/07/2011 03:32 PM sandip said:
हा हा हा काय बाई आहे ....विनाकारण प्रसिद्ध होण्या साठी गप्पा मारत आहे ..यांचे योग दान काय आहे माहित नाही पण त्या मुंडे आणि महाजानामुळेच वर आलेत हे लोक .....
On 01/07/2011 10:43 AM sudhakar said:
कायद्याने पक्षांतरास बंदी आणल्यास अशी नाटके संपुष्ठात येतील. पक्षांतर म्हणजे जनतेने निवडून दिल्याबद्दल त्यांचा विश्वासघात.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: