Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


देश
लखनौ - एखाद्या सरकारी कार्यालयात कामासाठी वारंवार खेटे घालूनही दाद घेतली जात नसेल तर काय करावं...? आणि समजा अनेक मिनतवाऱ्यांनंतर यदाकदाचित कुणी दाद घेतली, तरी काम करून देण्याच्या बदल्यात लाच मागितली तर...तर काय करावं? तर संबंधित कार्यालयात चक्क साप सोडावेत...! नाही, नाही, हा काही काम करवून घेण्याचा पर्याय मुळीचच होऊ शकत नाही...आणि तसं कुणी कुणाला सुचवूही नये...पण एके ठिकाणी खरंच असं घडलं आहे खरं! हे जिथं घडलं ते राज्य आहे - उत्तर प्रदेश.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

पंतप्रधानांचा पुढाकार कॉंग्रेसचे विरोधकांना अविश्‍वास ठरावाचे आव्हान नवी दिल्ली - संसदेतील कोंडी फोडण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. संसदेत मतदानाची वेळ आल्यास सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी मदत केली जाईल, अशी ग्वाही घटक पक्षांनी दिली आहे.

Friday, December 02, 2011 AT 03:45 AM (IST)

नवी दिल्ली - लोकपाल विधेयकावरील संसदीय स्थायी समितीचा अहवाल पूर्ण झाल्याची चर्चा असताना आज पुन्हा त्यात दुरुस्तीसाठी समितीची बैठक झाली. त्यातील बदलामुळे तब्बल 15 सदस्यांनी मतभिन्नतेची टिप्पणी (डिसेंट नोट) या अहवालावर दिली असून, त्यात भाजप, समाजवादी पक्ष, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, बिजू जनता दल, डाव्या पक्षांचा समावेश असल्याचे समजते. अभिषेक सिंघवी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालास कालच (ता. 30) अंतिम स्वरूप देण्यात आले होते.

Friday, December 02, 2011 AT 03:45 AM (IST)

ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून - रिटेल उद्योगक्षेत्रात 51 टक्के परकीय थेट गुंतवणुकीस (एफडीआय) परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध आज सारा देश एकवटल्याचे दिसून आले. देशातील बहुतेक राज्यांमध्ये या निर्णयाविरुद्ध तीव्र निदर्शने करण्यात आली.

Friday, December 02, 2011 AT 03:30 AM (IST)

नवी दिल्ली - बहुचर्चित लोकपाल विधेयक प्रत्यक्ष संसदेत सादर होण्याच्या मार्गातील काटे वाढू लागले आहेत. भाजपसह विरोधकांच्या गोंधळामुळे हिवाळी अधिवेशनाचे पहिले दोन आठवडे वाया गेल्याने हे विधेयक या अधिवेशनात कितपत सादर होऊ शकेल, याबाबत खुद्द संसदीय स्थायी समितीचेच सदस्य शंका व्यक्त करू लागले आहेत. ज्येष्ठ खासदार मोहनसिंग व राम जेठमलानी यांनी आज जाहीरपणे त्याचा उच्चार केला.

Friday, December 02, 2011 AT 03:00 AM (IST)

नवी दिल्ली - भारत व चीनदरम्यान भविष्यात अन्न, पाणी, वीज व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील स्थान याबाबत अटीतटीची स्पर्धा होणार आहे. मात्र, त्यांच्यात अत्यंत प्रक्षोभक कृती झाल्याशिवाय युद्धाची शक्‍यता नाही, असे मत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जाणकार व सिंगापूरच्या लिक्वान यू विद्यापीठातील प्रा. कांती वाजपेयी यांनी केले.

Friday, December 02, 2011 AT 02:45 AM (IST)

श्रीनगर - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार सरपंच आणि पंचांना देण्यात आला आहे. जम्मू-काश्‍मीर सरकारने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. धूम्रपानविरोधी कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. काश्‍मीर विभागाच्या विभागीय कार्यालयात "ओएसडी' अधिकारी आमीर अली यांच्या उपस्थितीत बैठक झाली. धूम्रपान नियंत्रक विभागाच्या अन्न निरीक्षकांनी या संदर्भात माहिती दिली.

Friday, December 02, 2011 AT 02:30 AM (IST)

तिरुअनंतपुरम - मुल्लपेरियार धरणातील पाण्याची पातळी 136 वरून 120 फुटांपर्यंत कमी करण्याची विनंती केरळ सरकारने तमिळनाडूला केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री ओमनचंडी यांनी याबाबत तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना पत्र लिहिले आहे. इदुक्की जिल्ह्यात गेल्या जुलै महिन्यापासून 26 वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Friday, December 02, 2011 AT 02:15 AM (IST)

नवी दिल्ली - ओबीसींसाठीच्या आरक्षणामध्ये मुस्लिमांसाठी खास आरक्षण ठेवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी आज दिली. उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही खेळी खेळण्यात येत असल्याचे मानले जाते. "ओबीसींसाठी सध्या 27 टक्के आरक्षण आहे. या कोट्यात मुस्लिमांसाठी खास आरक्षण ठेवण्याबाबत सर्व शक्‍यतांचा विचार करण्यात येत आहे.

Friday, December 02, 2011 AT 02:00 AM (IST)

अहमदाबाद - "बिग बी' अमिताभ बच्चन यांच्या घरात तान्हुलीच्या आगमनामुळे उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदात आपल्या नातीसाठी "बिग बी' यांनी गुजरातची राजधानी गांधीनगरजवळ सुमारे तीन हजार चौरस मीटरचा भूखंड खरेदी केला आहे. यासाठी त्यांनी सात कोटी रुपये मोजले आहेत. अभिनेत्री आणि बच्चन घरातील स्नुषा ऐश्‍वर्याने कन्यारत्नाला जन्म दिल्यानंतर तिला मिळालेली ही पहिली मोठी भेट मानली जात आहे.

Friday, December 02, 2011 AT 02:00 AM (IST)

चेन्नई - "तिरुचिरापल्ली येथून केरळमध्ये जाणारी सर्व वाहने 21 डिसेंबरला रोखली जातील,' असे मदुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके) पक्षाने जाहीर केले आहे. मुल्लापेरियार येथे नवे धरण बांधण्याच्या केरळच्या मागणीच्या विरोधातील आंदोलनाचा एक भाग म्हणूनच हे पाऊल उचलले आहे. याबाबत एमडीएमकेचे अध्यक्ष वैको म्हणाले, "केरळ सरकार आणि तेथील राजकीय पक्ष सध्याचे धरण उद्‌ध्वस्त करून नव्याने धरण बांधू इच्छित आहेत.

Friday, December 02, 2011 AT 01:45 AM (IST)

बालासोर (ओडिशा) - भारतीय लष्करासाठी विकसित करण्यात आलेल्या "अग्नी-1' या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटर आहे. ओडिशातील व्हिलर बेटावरून ही चाचणी घेण्यात आली. स्वदेशी बनावटीच्या, घनरूप इंधनावर चालणाऱ्या आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या "अग्नी-1' क्षेपणास्त्राची भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.25 वाजता मोबाईल लॉंचरद्वारे चाचणी घेण्यात आली.

Friday, December 02, 2011 AT 01:30 AM (IST)

अहमदाबाद - बहुचर्चित इशरत जहॉं चकमक प्रकरणाचा तपास नव्याने करण्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले, तसेच या प्रकरणातील दोषी पोलिसांवर खुनाचा आरोप दाखल करण्याचेही आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जोरदार झटका बसला आहे. एसआयटीने ही चकमक बनावट असल्याचा अहवाल देऊन मोदींना पहिली चपराक दिली होती.

Friday, December 02, 2011 AT 12:55 AM (IST)

कोलकता - चीनचा आक्षेप झुगारून पश्र्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन यांनी आज (गुरुवार) शहरात पार पडलेला दलाई लामा यांच्या कार्यक्रमास हजेरी लावली. अशा कार्यक्रमांना जाणे हे नित्याचेच आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दलाई लामा यांना पत्रकारांनी चीनच्या आक्षेपाबाबत विचारले असता ते महणाले, की हे अपेक्षित असून त्यांच्या नजरेत ते योग्य असू शकते.

Thursday, December 01, 2011 AT 07:34 PM (IST)

नवी दिल्ली - "टू जी' गैरव्यवहारप्रकरणी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांचे स्वीय सचिव आर. के. चंडोलिया यांना आज (गुरुवार) दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला. चंडोलिया यांना दोन फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. आपल्या पदाचा वापर करून टेंडर प्रक्रियेत बदल करवून काही कंपन्यांना फायदा करून दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. चंडोलिया हे राजा यांचे सचिव होते.

Thursday, December 01, 2011 AT 06:48 PM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: