Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


पुणे
पुणे - कैद्यांप्रमाणे नव्वद मुलींना वसतिगृहात कोंबून ठेवल्याचे विदारक चित्र खुद्द राज्याच्या आदिवासी विभागाच्या राज्यमंत्र्यांनीच पाहिले. राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास सोमवार पेठेतील आदिवासी मुलींच्या वसतिगृहास अचानक भेट दिली. या वेळी त्यांना दिसलेली दुरवस्था पाहून येत्या आठ दिवसांत वसतिगृह सर्व सुविधांनी सज्ज झाले पाहिजे, असा स्पष्ट आदेश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.

Friday, December 02, 2011 AT 04:15 AM (IST)

कळस - दगडी कोळशाची भुकटी भरून चाललेला ट्रक पुढील ट्रकला धडकून उलटल्याने चालकासह पाच जण जागीच ठार झाले, तर सात जण जखमी झाले. पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज क्रमांक दोन (ता. इंदापूर) येथे काम सुरू असलेल्या पुलाजवळील वळणावर मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृत व जखमी उस्मानाबाद, तसेच बिदर जिल्ह्यातील असून, ते मोलमजुरीच्या कामासाठी पुण्याकडे निघाले होते. ट्रकचालक उत्तम (पूर्ण नाव समजू शकले नाही.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

पुणे - खासगी बस कंपनीकडे प्रत्येक प्रवाशाची संपूर्ण माहिती असणे आणि प्रवासाच्या एकूण अंतरामध्ये असणारे थांबे व त्याच्या निश्‍चित वेळेची माहिती त्यांनी प्रवाशांना कळविणे बंधनकारक आहे. परंतु, या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जाते. कारण, साधारण 80 टक्के खासगी बसची वाहतूक रात्री उशिराने केली जात असल्यामुळे त्यांच्यावर कसलाच अंकुश राहिलेला नाही.

Friday, December 02, 2011 AT 04:00 AM (IST)

पुणे - डेंगळे पुलावरील एकेरी वाहतुकीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे येथे त्वरित दुहेरी वाहतूक करण्यात यावी, या मागणीसाठी स्थानिक नागरिक आणि नगरसेवक यांनी गुरुवारी शिवाजीनगर तोफखाना येथे उपोषणास सुरवात केली, तसेच मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दुहेरी वाहतुकीसंदर्भात कसबा पेठेतील पाचशे नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे सह्यांचे निवेदन दिले होते.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

पुणे - ज्येष्ठ महिलेची तोतया उभी करून कात्रज येथील तीन गुंठे जमीन 28 लाख 50 हजार रुपयांना विकल्याच्या आरोपावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींना शनिवारपर्यंत (ता.3) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. हेमंत छब्बन जगताप (वय 33 रा. जगतापआळी, सासवड) व किशोर चिदानंद मुधोळ (वय 29 रा. आनंदनगर, सुखसागरनगर) यांना अटक झाली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार विकास दिगंबर कदम (रा. कात्रज), तसेच मारुती शिवाजी कदम (रा.

Friday, December 02, 2011 AT 03:00 AM (IST)

पिंपरी - राज्य सरकारने तब्बल पावणेदोन लाख अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्याचा निर्णय जाहीर केलेला असतानाच दुसरीकडे सरकारी, निमसरकारी आणि महापालिकेच्या आरक्षित जागा, रस्ते व नाल्यांवर अतिक्रमण करून, अनधिकृत बांधकामांतून जागा हडप करण्याचा धडाका सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्यांनी रीतसर परवानगी घेऊन बांधकाम केले, आठ टक्के विकास शुल्क भरले, बिगरशेती परवाना व सर्व प्रकारचे "ना हरकत' दाखले घेतले त्यांना अवघा एक चटई निर्देशांक आहे.

Friday, December 02, 2011 AT 03:30 AM (IST)

कोथरूड - एसएनडीटी पाण्याच्या टाकीमागे अमर सोसायटीसमोरील डोंगरउतारावर बांधकाम व्यावसायिकांनी बुधवारी पुन्हा राडारोडा टाकून सपाटीकरण सुरू केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याविरोधात नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली परंतु पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून एसएनडीटी पाण्याच्या टाकीच्या मागील बाजूस (एरंडवणा सर्व्हे क्र.44) अमर सोसायटीसमोरील बाजूस बांधकाम व्यावसायिकांकडून राडारोडा टाकून सपाटीकरण सुरू आहे.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

पुणे - मणिपूरमधील रंगकर्मी हयसनम कन्हाईलाल यांना यंदाचा तन्वीर सन्मान, तर गिरीश जोशी यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रूपवेध प्रतिष्ठानच्या कार्यवाह दीपा लागू, कार्याध्यक्ष विजय लागू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. श्रीराम लागू व दीपा लागू यांचे पुत्र तन्वीर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी 9 डिसेंबर रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

पुणे  - पुणे महापालिका निवडणुकीत स्वबळावरच लढविण्याचा सूर दोन्ही कॉंग्रेसने लावला असला, तरी ज्या ठिकाणी विरोधी पक्ष प्रबळ आहे, अशा प्रभागात दोन्ही कॉंग्रेसला एकत्र येऊन निवडणूक लढविता येईल का, याची आता चाचपणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच दोन्ही कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत पुण्यातील आघाडीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. या बैठकीत दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आघाडीला विरोधच केला.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

पुणे - ब्रिटनमधील स्टॅफोर्डशायर विद्यापीठाची पदवी पुण्यातच शिकून मिळविता येणार आहे. यासाठी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीतर्फे पुढाकार घेण्यात आला असून, दोन वर्षांचा व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. याबाबतच्या करारावर गुरुवारी सह्या करण्यात आल्या. ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्यासाठी भारतातून लाखो विद्यार्थी जातात. मात्र, मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी येथे शिक्षण घेणे स्वप्नवत असते.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

पुणे - आरोग्य, बेरोजगारी, स्वच्छतागृहे, अवैध धंदे, असुरक्षितता या प्रश्‍नांमुळे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नरकयातना भोगत झोपडीधारक आलेल्या परिस्थितीवर मात करत आपले जीवन जगत आहेत. राजकीय व्यक्ती व पोलिसांच्या आशीर्वादाने गुन्हेगारीला पाठिंबा मिळत असून, त्याचे परिणाम लहान मुलांवर होऊ लागला आहे.

Friday, December 02, 2011 AT 04:00 AM (IST)

पुणे - गोविंद मदनराव घोळवे यांची "सकाळ माध्यम समूहा'त कार्यकारी संपादक (राजकीय)पदी नियुक्ती करण्यात आली आहे. "सकाळ'च्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीची जबाबदारीही त्यांच्याकडे असेल. ते 17 वर्षे पत्रकारितेत आहेत. पुढारीमध्ये त्यांनी 15 वर्षे पिंपरी-चिंचवड येथे ब्यूरो चीफ म्हणून काम पाहिले आहे. अलीकडे ते "सकाळ'मध्ये विशेष प्रतिनिधी (राजकीय) या पदावर रुजू झाले.

Friday, December 02, 2011 AT 04:00 AM (IST)

पुणे - रिटेल क्षेत्रात होऊ घातलेली परकीय गुंतवणूक, तसेच जकातीला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या "भारत बंद'ला शहरातील बाजारपेठांमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एरवी प्रचंड गर्दी असलेला लक्ष्मी रस्ता आणि तुळशीबागेसह शेजारील "रिटेल' बाजारपेठांमध्ये आज "होलसेल' शुकशुकाट होता. शहराच्या इतर भागात मात्र व्यवहार सुरळीत होते. व्यापाऱ्यांनी काढलेल्या दुचाकी रॅलीसही मोठा प्रतिसाद मिळाला.

Friday, December 02, 2011 AT 04:00 AM (IST)

एमपीएससी परीक्षेचे नवे स्वरूप भाग 4 नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती जाहीर झाल्यापासून त्याविषयी चर्चा सुरू आहे. चर्चेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सनदी अधिकाऱ्याला आवश्‍यक असणाऱ्या गुणांची तपासणी या प्रकारच्या परीक्षा पद्धतीतून होईल की नाही? सामान्य प्रशासनासाठी निवडला जाणारा उमेदवार हा ओएलएमअसावा अशी अपेक्षा असते. म्हणजे परीक्षा देताना त्याचे व्यक्तिमत्त्व एखाद्या सक्षम अधिकाऱ्याप्रमाणे परिपूर्ण असावे असे अपेक्षित नसते.

Friday, December 02, 2011 AT 03:45 AM (IST)

पुणे - "फॅमिली डॉक्‍टर क्‍लब'ची नव्या वर्षातील (2011-12) पहिली व्हिडिओ कॉन्फरन्स येत्या रविवारी (ता. 4 डिसेंबर) होत आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांच्याशी क्‍लबच्या सदस्यांना आरोग्य संवाद साधता येणार आहे. कुटुंबाच्या आरोग्यस्वास्थ्याचा विचार करणाऱ्या "फॅमिली डॉक्‍टर क्‍लब'च्या नव्या वर्षातील पहिल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आपले आरोग्यविषयक प्रश्‍न विचारण्यासाठी पूर्ण वेळ राखून ठेवण्यात येणार आहे.

Friday, December 02, 2011 AT 03:45 AM (IST)

पुणे - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची गेल्या निवडणुकीपेक्षा पीछेहाट होणार असली आणि "भाजप-शिवसेना-रिपाइं' या महायुतीच्या काही जागा वाढणार असल्या, तरी "मनसे' फॅक्‍टर आणि अपक्षांच्या मदतीने पुणे महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी सत्तेवर येऊ शकते, असा अंदाज "रूरल रिलेशन' या संस्थेने निवडणूकपूर्व पाहणीवरून व्यक्‍त केला आहे.

Friday, December 02, 2011 AT 03:30 AM (IST)

पुणे - "संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यात देशाला यश मिळाले आहे, पण आता अससंर्गजन्य आजारांचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. झपाट्याने पसरणाऱ्या असंसर्गजन्य रोगांना रोखण्यावर वैद्यकीय संशोधकांनी लक्ष्य केंद्रित केले पाहिजे,'' असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. "इंन्डोक्राइन सोसायटी ऑफ इंडिया'तर्फे आयोजित केलेल्या 41व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

Friday, December 02, 2011 AT 03:30 AM (IST)

पुणे - संगणक व मोबाईलसह इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्या वाढलेल्या किमती कमी होण्यासाठी आणखी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया आणि काही दिवसांपूर्वी थायलंड येथे आलेल्या महापुरामुळे इलेक्‍ट्रॉनिक हार्डवेअर बाजारात निर्माण झालेला तुटवडा हेच या "महागाई'मागचे मुख्य कारण असल्याचे शहरातील वितरकांनी सांगितले.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

पुणे - "सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच' सभासदांसाठी फेस्कॉमच्या सहयोगाने पु. ल. देशपांडे लिखित "तुझे आहे तुजपाशी' या नाटकाचे दोन विनामूल्य प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी 3 डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 10 आणि सायंकाळी पाच वाजता या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चर्स, सह्याद्री फूटवेअर, लोटस खाकरा शबरी खाकरा, अथर्व आयुर्वेद फार्मास्युटिकल्स हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

Friday, December 02, 2011 AT 03:30 AM (IST)

पुणे - दोन्ही कॉंग्रेसची आघाडीवर चर्चा सुरू असतानाच महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजप-शिवसेना युतीने गुरुवारी आणखी एक पाऊल पुढे टाकले. युतीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत तीस प्रभागांतील साठ जागांवर, तर तेहतीस प्रभागांतील प्रत्येकी एक जागेवर दोन्ही पक्षांत प्राथमिक स्तरावर एकमत झाले. गेल्या वेळेपेक्षा दोन्ही पक्षांनी यंदा वाढीव जागांवर दावा केला आहे, तर सायंकाळी भाजप आणि रिपब्लिकन पक्ष यांची स्वतंत्र बैठक झाली.

Friday, December 02, 2011 AT 03:30 AM (IST)

पाटस - दौंड तालुक्‍यात बेकायदेशीर वाळू उपसाविरोधात कारवाईचे सत्र सुरूच असून गुरुवारी (ता. 1) महसूल विभागाच्या पथकाने कानगाव येथील भीमा नदी पात्रातील तीन पाडाव जाळून टाकले, तर पाटस येथे बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिली. राहू (ता. दौंड) येथे काही दिवसापूर्वी वाळू उपसा करण्याच्या वादातून गोळीबारात दोन युवकांचा मृत्यू झाला होता, तर एक गंभीर जखमी झाला होता.

Friday, December 02, 2011 AT 03:30 AM (IST)

पुणे - आतापर्यंत केवळ आश्‍वासने आणि चर्चेच्या पातळीवर हवेतच असणारी पुण्यातील "मेट्रो' प्रत्यक्ष रुळावर येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. "मेट्रो' कशी करावी, याबाबत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी मुंबईत पुन्हा अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, केंद्र शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

Friday, December 02, 2011 AT 03:30 AM (IST)

पिंपरी - रिटेल क्षेत्रात 51 टक्के परकीय गुंतवणुकीच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेल्या "भारत बंद'चा गुरुवारी (ता. 1) उद्योगनगरीत फज्जा उडाला. शहरातील व्यवहार नित्याप्रमाणे सुरळीत सुरू होते. मात्र, बंदला किरकोळ व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा व्यापारी संघटनेने केला आहे. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पातील बहुतांश दुकाने उघडी होती. रस्त्यावरील फेरीवाले व विक्रेते यांचीही वर्दळ सुरू होती.

Friday, December 02, 2011 AT 03:30 AM (IST)

पुणे - हवा त्या वेळी विश्‍वकोश पाहता यावा, त्यातील माहिती सर्व क्षेत्रांतील लोकांना समजावी, यासाठी तो संकेतस्थळावर आणला जात आहे. येत्या काही दिवसांत मोबाईल आणि "आय-पॅड'वरही विश्‍वकोश उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाने पावले उचलली आहेत. तसेच, राज्यातील कर्तबगार स्त्रियांच्या कार्यावर आधारित "महाराष्ट्र कन्याकोश' तयार करण्याचा निर्णयही मंडळाने घेतला आहे.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

मगरपट्टा - हडपसर येथील गाडीतळ उड्डाणपूल मागील काही दिवसांपासून अंधारात होता. बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विजेच्या दिव्यांची दुरुस्ती सुरू केली असून एक दोन दिवसांतच तेथे नवे पथदिवे बसवून ते कार्यान्वित करण्यात येतील, असे आश्‍वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. विजेचे दिवे बंद असल्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली होती. त्यासंदर्भातील सचित्र माहिती "सकाळ' (ता. 28) मध्ये प्रसिद्ध झाली होती.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

पुणे - केंद्रीय नगर विकास मंत्रालयाचा पुरस्कार मिळालेला पुण्यातील "ट्रॉफिकॉप' प्रकल्प प्रत्यक्षात मात्र सध्या तो बंद आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला प्रस्ताव अद्याप राज्य सरकारकडे पडून आहे. सजग नागरिक मंचचे जुगल राठी यांनी याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले आहे.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

पुणे - जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्रांमध्ये दाखल्यांसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उत्पन्न, अधिवास आणि जात प्रमाणपत्र शाळांमधून देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एक हजार शाळांत ही मोहीम राबविली जाणार आहे. डिसेंबर महिन्यात अर्जस्वीकृती, त्यावर एक महिन्यात प्रक्रिया आणि फेब्रुवारी महिन्यात वाटप, अशी ही योजना आहे.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

कर्वेनगर - अनंत अंतरकर हे लेखकांचे संपादक होते. आमच्यासारख्या लेखकांची एक पिढी घडवण्याचे काम त्यांनी केले, असे प्रतिपादन साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी केले. कै. अनंत अंतरकर जन्मशताब्दीनिमित्त विनोदी लेखक आणि पटकथाकार द. मा. मिरासदार आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांना हंस पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी कर्णिक बोलत होते. आनंद अनंत अंतरकर आणि अभिनेत्री आशा काळे-नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

पुणे - विद्यापीठ विभाजनाबाबत डॉ. अरुण निगवेकर समितीने सादर केलेल्या अहवालात सिनेट, अधिष्ठात्यांची नियुक्ती, अभ्यासमंडळांची कमी झालेली संख्या याबाबत शैक्षणिक वर्तुळात मतभेद निर्माण झाले आहेत. पुणे, मुंबई व नागपूर विद्यापीठांचे विभाजन करण्याबाबत राज्य सरकारने डॉ. अनिल काकोडकर, डॉ. निगवेकर व डॉ. राम ताकवले यांच्या समित्या नियुक्त केल्या आहेत. त्यांच्या अंतिम अहवालाचे सादरीकरण 23 नोव्हेंबर रोजी मंत्रालयात झाले. डॉ.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

वडगाव शेरी - येथील साईनाथनगर हा मुन्नरवर सोसायटीमार्गे जाणारा रस्ता गुरुवारी पालिकेच्या पथ विभागाने डांबरीकरण करून खुला केला. गेल्या पन्नास वर्षांपासून रस्ता खुला करावा, अशी मागणी नागरिक करीत होते. सदर जागेवर मालकी हक्क सांगत या रस्त्याचे काम करण्यास सुरवातीला जागामालकांनी विरोध केला. मात्र, आमदार बापू पठारे यांनी स्वतः जागेवर येऊन कामाला विरोध करणाऱ्यांशी बोलणी केली. पालिकेकडून योग्य तो मोबदला देण्याचे आश्‍वासन दिले.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

कोथरूड - एसएनडीटी पाण्याच्या टाकीमागे अमर सोसायटीसमोरील डोंगरउतारावर बांधकाम व्यावसायिकांनी बुधवारी पुन्हा राडारोडा टाकून सपाटीकरण सुरू केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याविरोधात नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली परंतु पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून एसएनडीटी पाण्याच्या टाकीच्या मागील बाजूस (एरंडवणा सर्व्हे क्र.44) अमर सोसायटीसमोरील बाजूस बांधकाम व्यावसायिकांकडून राडारोडा टाकून सपाटीकरण सुरू आहे.

Friday, December 02, 2011 AT 03:15 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: