Majha Posiview
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

गुढीपाडव्याला सांस्कृतिक मेजवानी
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 22, 2012 AT 12:27 AM (IST)
Tags: gudhi padwa,   pune
पुणे - गुढीपाडवा म्हणजे नव्या वर्षाचा प्रारंभ. हा आनंदाचा, उत्साहाचा क्षण द्विगुणित करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था पुणेकर रसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानी घेऊन येत आहेत. शब्द-सुरांची "पाडवा पहाट', सामाजिक ऐक्‍याची गुढी, सांस्कृतिक गुढी, पुस्तक दिंडी, शोभायात्रा... असे नानाविध कार्यक्रम शुक्रवारी (ता. 23) होणार आहेत.

शास्त्रीय, उपशास्त्रीय, पाश्‍चिमात्य संगीत यांचा मिलाफ असलेला "चैत्राहन : एक सोनेरी पहाट' हा कार्यक्रम "चौरस'ने आयोजित केला आहे. सिद्धी गार्डन येथे सकाळी साडेसात वाजता होणाऱ्या मैफलीत गायिका मधुरा दातार, गायक धवल चांदवडकर सहभागी होत आहेत. "संवाद'तर्फे भार्गवी चिरमुले-पंकज एकबोटे या नवदाम्पत्याच्या हस्ते सांस्कृतिक गुढी उभारली जाणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
मैत्रयुवा फाउंडेशनतर्फे सामुदायिक गुढी उभारली जाणार आहे; तसेच वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी आचार्य अत्रे चौकात सकाळी साडेदहा वाजता पुस्तक दिंडी काढली जाणार आहे. दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे सकाळी साडेसात वाजता मंदिरासमोर सामाजिक ऐक्‍याची गुढी उभारली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता रमणबागेच्या पटांगणावर सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. सिंथेसिस आणि शारदा अलायन्सने "गुढीपाडवा पहाट' आयोजित केला आहे. बालशिक्षण शाळेच्या सभागृहात सकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार असून, श्रीधर फडके "गीतरामायण' सादर करणार आहेत.

शांता शेळके यांच्या गीतांवर "मी डोलकर' ही मैफल शिवप्रबोधन प्रतिष्ठानने आयोजित केली आहे. धनकवडीतील ओंकार पार्क येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या मैफलीत राहुल घोरपडे, ऋतुजा सरोदे सहभागी होत आहेत. आदित्य प्रतिष्ठानतर्फे एमआयटी महाविद्यालयात सायंकाळी पाच वाजता कथाकथन व गायनाचा कार्यक्रम होणार असून, यात शंकर अभ्यंकर, जितेंद्र अभ्यंकर, आदित्य अभ्यंकर सहभागी होत आहेत. याशिवाय घरकुल लॉन्सवर पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव शुक्रवारपासून सुरू होत आहे. यात रघुनंदन पणशीकर, अर्चना कान्हेरे, आनंद भाटे, कल्पना झोकरकर आदी कलाकार सहभागी होत आहेत.

साहित्यिकांची डायरी
"अक्षरभारती'तर्फे साहित्यिकांची अनोखी डायरी तयार करण्यात आली आहे. अनेक दिग्गज साहित्यिकांची माहिती, दुर्मिळ छायाचित्रांनी ती सजविण्यात आली आहे. नव्या वर्षानिमित्त तिचे प्रकाशन समीक्षक रा. ग. जाधव यांच्या निवासस्थानी होणार आहे. सकाळी दहा वाजता हा अनौपचारिक सोहळा होईल.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 22/03/2012 06:09 PM Girish M Kirpan said:
pratyek karyakramachya details kalwa 1.konta program kuthe ani kitila suru honar


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: