नितीन जयराम गडकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नितीन जयराम गडकरी (मे २७, इ.स. १९५७ - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधवले.

इ.स. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्‍तिक साधने
नामविश्वे
अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये