आपल्या कविता,लेख,पाककृती मराठीमातीवर प्रसिद्ध करा, आजच आपले साहित्य पाठवा.

वस्त्रे

येवले पैठणी, संग्रहः ललितबाई लालचंद

कापसाचा शोध मानवी जीवनातील अतिशय क्रान्तिकारी घटना होय. कारण या शोधामुळे मानवाची रानटी अवस्था संपून त्याची सुसंस्कृत अवस्थेकडे वाटचाल सुरु झाली. आता नखदंतावलंबी, भटके, अर्धनग्न जीवन संपून स्थिर व निश्चित जीवनास आरंभ झाला. कारण कापूस पिकविणे म्हणजे कृषीजीवन जगणे होय.आता त्याला झाळांच्या ओधड-धोबड साली नेसण्याची व मृत जनावरांची कातडी पांघरण्याची आवश्यकता नव्हती. कारण कापसापासून सहजरीतीने वस्त्रे तयार करता येत होती. तसेच ती टिकाऊ असून धुता येत होती त्यामुळे त्यांचा झपाट्यांने प्रसार झाला.

कापसापासून कापड तयार करण्याचे ज्ञान त्याला पशुपक्ष्यांपासून अवगत झाले असावे. स्त्रियांनी या क्षेत्रात कमालीची प्रगती साधली. कारण स्त्रिया वस्त्र विणन्यात प्रवीण असल्याचे अनेक संदर्भ आपणास प्राचीन वाङ्‍मयामध्ये सतत आढळतात.

रेशमाचा शोध ही सुद्धा मानवी जीवनातील अत्यंत सुखद घटना होय. रेशीम कापसापेक्षा मुलायम असून त्याची वस्त्रे अधिक आकर्षक व टिकाऊ असतात. तथापि भारतीयाना रेशीमतयार करण्याचे ज्ञान नव्हते असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. कारण रेशमाची पैदास करणारा चीन हा एकमेव देश असून त्याने हेज्ञान इसवी सनाच्या काही शतकांपर्यंत अत्यंत गुप्त ठेवले होते. आजही जगामध्ये भारतीय रेशमापेक्षा चिनी रेशीम अधिक लोकप्रिय आहे. तसेच प्राचीन साहित्यामध्ये रेशमाचा उल्लेख ‘चीनसुक’ अशा प्रकारे आलेला आढळतो. त्यामुळे वरील विधानास पुष्टी मिळते. त्यामुळे रेशमाचे उत्पादन व त्यापासून वस्त्र तयार करण्याची कला भारतीयाना ज्ञात नसावी असा समज पसरण्यास मदत झाली.

असे असले तरी पुरातत्व शास्त्रज्ञाना अगदी अलिकडे नवीन पुरावे उपलब्ध झाले आहेत. प्रागैतिहासिक व ऐतिहासिक स्थळांच्या उत्खननामध्ये अगदी खालच्या थरात रेशमाचे अवशेष उपलब्द झाले आहेत. या सर्व पुरातत्वीय पुराव्यावरून येथील मानवास कापसाप्रमाणेच रेशमापासून वस्त्रे तयार करण्याची कला प्रागैतिहासिक(proto-historic) कालापासून अवगत असल्याचे स्पष्ट होते. या बरोबरच त्याला जरतारी व भरतकामाचेही ज्ञान असल्याचे समजते.

वर्ग: , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया द्या

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *

*
*