महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे राज्य मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आनावरण

Atul Sawe

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे आनावरण राज्य मंत्री अतुल मोरेश्वर सावे यांच्या हस्ते औरंगपुरा येथे करण्यात आले. शहरातील नागरिकांची ईच्छा होती की, महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्या जवळच सावित्रीबाई फुले यांचा देखील पुतळा व्हावा कारण औरंगपुरा हे खुप पुर्वीपासूनचे शैक्षणिक हब आहे व या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांची प्रेरणा घेऊन मोठे व्हावे अशी इच्छा यावेळी राज्य मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली. या पुतळ्याचे शिल्पकार निरंजन मडिलगेकर व त्यांच्या मातोश्री यांनी हा पुतळा बनवल्या बद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच औरंगपुरा येथील महात्मा फुले भाजी मंडईतर्फे उपस्थित नेत्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी आ.अंबादास दानवे, माजी खा.चंद्रकांत खैरे, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, प्रदेश सदस्य अनिल भैय्या मकरिये, महापौर नंदकुमार घोडेले, सभापती जयश्री कुलकर्णी, अँड.माधुरी अदवंत, मनपा आयुक्त डॉ निपुण विनायक, प्रशांत देसरडा, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, गजानन बारवाल, विकास जैन, त्र्यंबक तूपे, बापु घडामोडे, रामेश्वर भादवे, मनोज घोडके, बंडू ओक, पृथ्विराज पवार, बबीता चावरीया, रामभाऊ पेरकर, शशिकला खोबरे, अभिमन्यु , दिपक मुंडे, गजानन सोनवणे, अनिता देवतकर, ऊत्तमराव शिरसाठ, संगीता पवार यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : रागाच्या भरात पत्नीने केला पतीचा चाकू भोसकून खून